E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सासरा आणि दिराच्या मुसक्या आवळल्या
Wrutuja pandharpure
24 May 2025
वैष्णवी प्रकरण : पाच दिवसांची पोलिस कोठडी
पुणे
: वैष्णवी मृत्यू प्रकरणी मागील सात दिवसांपासून फरारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे पिता-पुत्रांना बावधन पोलिसांनी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सापळा रचून स्वारगेट येथे अटक केली. तर, शिवाजीनगर न्यायालयाने दोघांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. वैष्णवीला पती शशांकने पाइपने मारहाण केली होती, हे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या गुन्ह्यात ११८ (२) कलमवाढ केली आहे. ज्या पाइपने वैष्णवीला मारहाण झाली होती तो पाइप पोलिसांनी जप्त केला आहे.
माहेरहून पैसे आणण्यासाठी वैष्णवी शशांक हगवणे (वय २३, मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम) हिचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. घटनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा मुळशीचा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र तुकाराम हगवणे (वय-५७) आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे (वय २७, भुकूम, ता. मुळशी) पसार झाला होता. या दोघांना काल बावधन पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी वैष्णवीचे वडील आनंद ऊर्फ अनिल बाळासाहेब कस्पटे (वय-५१, वाकड) यांनी बावधन पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार, वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली. तिघांना यापूर्वीच २६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे वकील योगेश कदम तर फिर्यादीतर्फे वकील शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली. आरोपीतर्फे वकील स्वानंद गोविंद वार यांनी बाजू मांडली.
एकूण आठ पथके राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या मागावर होती. या प्रकरणात पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे स्वतः लक्ष ठेवून होते. आवश्यक त्या सूचना देत होते. प्रत्येक वेळी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा ठावठिकाणा बदलत असल्याने त्यांना पकडणे अवघड जात होते. अखेर काल पहाटे स्वारगेट परिसरातून त्यांना पोलिसांनी अटक केली. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हे दोघे तळेगाव येथील एका हॉटेलात मटणावर ताव मारत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. शवविच्छेदनानंतर मानेला गळफास लागल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असून शरीरावर अनेक बोथट दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. रासायनिक विश्लेषणासाठी मृतदेहाचे अंतर्गत अवयव आणि साहित्य राखून ठेवण्यात आले आहे. मृतदेहावरील जखमा पाहता वैष्णवीस वेगवेगळ्या हत्यांरांनी मारहाण केल्याचे दिसून येत आहे.
त्यांपैकी एक प्लास्टिकचा पाइप पती शशांक याने दिलेल्या जबाबावरून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणात, राजेंद्र व सुशील हगवणे यांनीही वैष्णवीस मारहाण केली आहे. गुन्हा घडल्यापासून दोन आरोपी फरारी झाले होते. यादरम्यान ते कोठे राहत होते, त्यांना कोणी आर्थिक मदत केली यासह गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी वकील कदम व वकील निंबाळकर यांनी केली.
भाजपचे आंदोलन
भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने काल आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोपींना फाशी देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
न्यायालयाचा चकवा
बावधन पोलिस स्टेशनचा आरोपी असल्याने शिवाजीनगर न्यायालयातील ६ क्रमांकाच्या न्यायालयात सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र, न्यायाधीश सुट्टीवर आहे. त्यामुळे ५ क्रमांकाच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. त्या अनुषंगाने वकील, पत्रकार आणि सर्वमामान्य नागरिक तेथे जमले होते. मात्र, तेथे सुनावणी झालीच नाही. न्यायाधीशांसह सरकारी, फिर्यादीचे वकील, आरोपीचे वकील गेले. दुसर्या न्यायालयातच सुनावणी झाली. अशा प्रकारे न्यायालयाने सर्वांना चकवा दिला.
Related
Articles
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेचा १४८व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात
31 May 2025
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
इलेक्ट्रॉनिक्स घटकनिर्मिती योजनेला प्रतिसाद
31 May 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
मेधा पाटकर यांना ओडिशातील रायगडामध्ये जाण्यापासून रोखले
06 Jun 2025
काळ्या काचांविरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई
05 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर